अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणनागपूरसाहित्यगंध
प्रीतरात्री
सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे श्रीवर्धन जि. रायगड
0
4
8
2
8
6
प्रीतरात्री
भिजवून टाकशील कधी रे दिवे
मखमली या शैयात
पेटवून माझे अंग अंग
सखया कधी भेटेल तुझा निवांत संग
कधी करशील रे माझे स्वप्नभंग
मोगऱ्याच्या फुलांनी शेज सजली
नभी चंद्रापाशी एक चांदणी चमकली
गार गार त्या हवेत
घेऊन मला तुझ्या कवेत
मोकळे करून टाक एक एक अंतरंग
दूरवर तारकात वाट पाहत आहे चांदरात
सावकाश घे टिपूनी माझे हे रूप रंग
कसला हा तुझ्या श्वास
दरवळ येथे सुवास
जिरपून जाऊदे आता मातीत या दवास
सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे
श्रीवर्धन जि. रायगड
======
0
4
8
2
8
6



