
0
5
2
4
6
6
रामोत्सव
दारी सडा नि रांगोळी
गुढया तोरण घरोघरी
नानाविध पुष्पहारांनी
सजली अयोध्या नगरी…!!
कौशल्या दशरथ बाळ
मातृपितृ भक्त श्रीराम
पदस्पर्शाने पावन भूमी
मुखी सर्वांच्या राम नाम..!!
आदर्श पुत्र बंधू नि पती
कुटुंबवत्सल राजा राम
राज्यपदाचा मोह नाही
वचनपूर्ती करीतो श्रीराम..!!
शबरीची उष्टी बोरे खाल्ली
उद्धारी भिलिणीला श्रीराम
शिळा बनलेल्या अहिलेला
करीतो शापमुक्त श्रीराम..!!
रामोत्सव साजरा करताना
रामलीलांचे करूया स्मरण
राम नामाचा जप करताना
होई पापमुक्त संसार जीवन..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
5
2
4
6
6



