Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेविदर्भसाहित्यगंध

समाजमाध्यम पुरस्काराने जपली वसुधा फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी

स्वाती मराडे, इंदापूर पुणे मुख्य सहसंपादक 'साप्ताहिक साहित्यगंध'

0 4 8 2 8 6

समाजमाध्यम पुरस्काराने जपली वसुधा फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी

समाजात अनेक क्षेत्रांत विविध माध्यमांतून लोक समाजाभिमुख कार्य करत असतात. विद्या, कला, प्रसारमाध्यमे, समाजसेवा, साहित्यसेवा या क्षेत्रात अनेकजण आपला वेगळा ठसा उमटवतात. या सर्वांना प्रेरणारूपी पावती देऊन उत्साह वाढवण्यासाठी ‘वसुधा फाउंडेशन’ पुणे यांचेकडून समाजमाध्यम पुरस्काराचे वितरण नुकतेच पुण्यात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाटककार डाॅ. मधुसूदन घाणेकर हे होते. तर आम्ही मुंबईकर वृत्तपत्राचे संपादक प्रमोद सूर्यवंशी हे उद्घाटक म्हणून लाभले.

वसुधा फाउंडेशनच्या अध्यक्षा वसुधा नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी ‘मराठीचे शिलेदार’ बहुउद्देशीय संस्थेकडून प्रसारित होत असलेल्या ‘साप्ताहिक साहित्यगंध’चा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. या कार्यक्रमास ‘साप्ताहिक साहित्यगंध’च्या मुख्य सहसंपादिका व मुख्य परीक्षक ‘स्वाती मराडे’ या प्रामुख्याने उपस्थित होत्या. समाजमाध्यमात आदर्शवत लेखन करून अनेक नवोदितांना प्रेरणा देण्याचे अविरतपणे त्या कार्य करीत असल्याने वसुंधरा फाऊंडेशनतर्फे सन्मान स्वीकारण्याचे त्यांना भाग्य लाभले.

गेली ३६ वर्षे वसुधाताईंनी समाजकार्यात अग्रेसर राहून अनेक माणसे जोडली आहेत. त्यांच्या या कार्यक्रमास आपलाच घरचा कार्यक्रम आहे, असे समजून कार्यभार सांभाळणारे कार्यकर्ते पाहून याची प्रचिती आली. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले व अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. अनेक शैक्षणिक संस्थामध्ये भेटी देऊन शालेय साहित्य वाटप असो किंवा वृद्धाश्रम, अनाथाश्रम यांना देणगीरूपी मदत करणे असो, वसुधाताई नेहमीच आपला वाटा उचलण्यास तयार असतात. हे सर्व करत असताना त्यांनी जी माणसे अनुभवली, जवळून पाहिली या सर्वांचा सन्मान करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला व त्यानिमित्ताने एका देखण्या कार्यक्रमाचे आयोजनही केले.

नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक सजावटीसाठीही त्यांनी पुरस्कार वाटप केले. याशिवाय ‘आईचे हळवे मन’ या त्यांच्या कथासंग्रहावर आधारित घेतलेल्या काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच युवाक्रांती संघटना, पोलिस मित्र संघटना यांचाही यथोचित सन्मान केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीशैल सुतार व श्री. योगेश हरणे यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य सहसंपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध’

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे