Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरनांदेडसाहित्यगंध

फुकट्यांची जत्रा

बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड

0 4 8 2 8 4

फुकट्यांची जत्रा

नाही खिशात फुटकी दमडी
ऐटीत मात्र स्वतः मिरवतात
हौशे गवशे नवसे मिळूनिया
फुकट्यांची जत्रा भरवतात

ऐकावे तयांचे बोलणे असे की
जणू आहेत हे कुबेराचे धनी
मारती गोळ्या हवेत लाखाच्या
जाऊ महाबळेश्वर नि पाचगणी

अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन
नका शिकवू आम्हा शहाणपणं
वीतभराचे वावभर सांगून
का ठेवता तुम्ही अक्कल गहाणं

कशाला करता प्रदर्शन गड्यांनो
भरवून फुकटच्या जत्रेचं सोंगं
दूधखुळे नाहीत बघा समोरचे
पाडतील उघडे तुमचे हे ढोंगं

पचल ते खावं शोभल ते ल्यावं
मंत्र बेताचा जरा ध्यानी धरा
बुद्धीमान असशी प्राणी मानवा
सत्यमार्गाचा या अवलंब करा

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे