
0
5
3
6
4
3
लबाड कुठला
नाम्या फाकड्या
रोज मळ्यात जायचा
वांगी कांदे काकड्या
फळे भाज्या चोरायचा.
मळ्यात होते बुजगावणे
त्याला म्हणायचा
“वांगी घेऊ का थोडी “?
आपणच म्हणायचा ,
“घ्या की हवी तेवढी.”
माळ्याने ठरवले
चोराला पकडायचे
हातात घेऊन दांडके
लपला बुजगावण्यामागे.
नाम्या आला नेमाप्रमाणे
पकडले माळ्याने
माळीदादा म्हणाला ,
“चोरदादा चोरदादा
मार देऊ का थोडा”?
स्वतःच म्हणाला
“द्या की हवा तेवढा.”
नाम्या लबाड कुठला
दांडक्याने कुटला
धूम पळत सुटला
पुन्हा नाही भेटला .
खोट्याच्या माथी सोटा
खऱ्याचा गौरव मोठा.
विमल धर्माधिकारी
वाई, जि.सातारा
0
5
3
6
4
3



