0
4
8
2
9
7
बंदिवान
फडफडणाऱ्या पंखाचा, वारा आला दारी
एक अनाहुत पाहुणा, आला माझ्या घरी…
पंख आवरून झाला, ओसरीत विराजमान
दुरदेशीचा पाहुणा तो, जणू होता बंदिवान
पायाला त्याच्या होती, एक बंदिवानाची खूण
आला असेल कदाचित, पिजऱ्यातून मुक्त होऊन
व्याकुळ पक्षाला पाहून, भूतदया जागली मनात
दाणे, जल मांडून पुढे, भागविली भूक तहान
कसल्या तरी आवाजाने, साधत होता हितगुज
दावत होता मजला, इशाऱ्याने बंदिवासाची खूण…..
नयन त्याचे पाझरु लागले, करता हृदयीचे कथन
भाव कळला शब्दावीन, गहिवरले माझेही मन
बंदिवसातून आज पक्षी, झाला होता मोकळा
त्याच्या साठी खुला होता, आसमंत सगळा
भरून चोचित दाणे, त्याने घेतली गगन भरारी
त्याच्या स्वागता उभी, प्रभातीची किरणे सोनेरी.
इंदू मुडे ब्रम्हपुरी.चंद्रपूर
0
4
8
2
9
7



