
0
5
7
8
9
8
वारकरी
युवाशक्ती हिच,देशाची ताकत ,
सूर्यास कोणीच,नाहीरे झाकत !
ज्ञान प्रकाशाने ,चमकती तारे
उजळून दिशा,नांदतील वारे!!
युवक आजचे ,योजतील युक्ती ,
सकळ जनाची, करतील मुक्ती !
म्हातारे कुतारे , नवे घेत नाही ,
वास्तव पाहून , न्याय देत नाही !!
युवकांनो तुम्ही, सत्ता हाती घ्यारे,
लोकशाही खरी ,जीवनी आणारे !
विज्ञान संपदा , तुमची संपत्ती ,
बदलून टाका , सारी अधोगती !!
राज्य घटनेचा , बाळगा सन्मान ,
अबाधित ठेवा , आन बान शान !
तुम्ही वारकरी ,चला पंढरीला ,
तिरंगा देईल , प्राण जिन्दगीला!!
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा, जि.यवतमाळ
===========
0
5
7
8
9
8



