
0
6
1
1
8
9
पळती झाडे
झुकु झुकु आगगाडी
मामाच्या गावी सोडी
मामा आला न्यायला
जातो मामाच्या गावाला.
खंडाळ्याचा घाट
वळणाची वाट
झुकू झुकू गाडी
नागिनीचा थाट .
इंजिन चाले पुढे
डबे मागे मागे
आवाजाला घाबरून
पळती झाडे मागे .
मामाच्या बागेत
पिकलेल्या केळी
मामीच्या हातची
शिखरण पोळी .
आजोळचे अंगण
नातवांची पंगत
आजीच्या गोष्टीला
चांदण्याची संगत.
विमल धर्माधिकारी
वाई, सातारा
0
6
1
1
8
9



