
0
5
9
7
0
2
नाग बाप्पा
नाग बाप्पा
तू असा रे कसा
वेटोळे घालून
बसतोस कसा ॥१॥
फूस करून
रागवितोस आम्हांवर
येतोस धावून
आमच्या अंगावर ॥२॥
शेताची राखण
पिकावर ध्यान
बळीला मदत
करतो तूं छान ॥३॥
देऊन तुला मान
मनोभावे करून पूजन
ठेवतो भान
मनात असते जाण ॥४॥
आमच्याशी नको ना
खेळूस कुस्ती
इजा नको करू ना
नको ती मस्ती ॥५॥
श्रीमती नीला पाटणकर
शिकागो
0
5
9
7
0
2



