मुधोजी बालक मंदिर प्रशालेत पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात
वसुधा नाईक प्रतिनिधी
मुधोजी बालक मंदिर प्रशालेत पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात
वसुधा नाईक प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज सातारा
फलटण (दि १६): फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी बालक मंदिर फलटण या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ 10 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री चंद्रकांत दिनकर पाटील साहेब सदस्य गव्हर्निंग कौन्सिल हे होते तर प्रमुख पाहुण्या मा. सौ. वसुधा वैभव नाईक (माजी विद्यार्थिनी ) समाजसेविका, आदर्श शिक्षिका, लेखिका, कवयित्री रा. पुणे या उपस्थित होत्या. त्याचबरोबर गव्हर्निंग कौन्सिल चे सदस्य मा. श्री. घोरपडे साहेब, मा. श्री. शिरीष दोशी साहेब, मा. श्री. नाळे साहेब, संस्थेचे प्रशासन अधिकारी मा. श्री निकम सर, तपासणी अधिकारी श्रीमती रणवरे मॅडम उपस्थित होते.
तसेच मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज चे प्राचार्य मा. श्री. शेडगे सर इंग्लिश मिडीयम माध्यमिक व जुनि. च्या प्राचार्या मा. सौ. फाळके मॅडम उपस्थित होत्या. संस्थेच्या सर्व बालक व प्राथमिक विभागाचे प्रमुख श्री. शिंदे सर, जाधव मॅडम, काकडे मॅडम, कुचेकर मॅडम, खलाटे मॅडम, चौधरी मॅडम, सावंत मॅडम व साबळे मॅडम इंग्रजी माध्यम च्या जिराईत मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताच्या सादरीकरणाने झाली.
सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन मुख्याध्यापिका सौ. राजपूत यांनी केले. सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपशिक्षिका सौ. शितोळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षिकांना ट्रॉफी आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुण्या मा. सौ. वसुधा नाईक यांनी प्रथम सरस्वतीची प्रार्थना म्हणून भाषणाला सुरुवात केली.शाळेचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या स्वतःच्या कार्याबद्दल सांगितले. शाळेत झालेले बदल त्यांना आवडल्याचे सांगितले. त्यांचे शालेय बालपण त्यांनी थोडक्यात सांगितले. त्या त्यांच्याच शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल खूप खुश होत्या, त्या बद्दल भरभरून बोलल्या. त्यांच्या बरोबर त्यांची कन्याही आली होती.
अध्यक्ष मा. श्री. पाटील साहेबांनी संस्थेच्या विविध शाखाची माहिती दिली. श्रीमंत मालोजीराजे यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल सांगून आपल्या संस्थेत असलेल्या विविध अभ्यास क्रमाच्या शाखेत पाल्यांना शिकवण्याचे आवाहन केले. प्राथमिक विभागातील उपशिक्षिका सौ. शिंदे व सौ. भोसले मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध गुण दर्शन सादर केले. यात गणपतीची गाणी, छत्रपती शिवाजी महाराज, आई, पोषण आहार गीत, जिंदगी की यही रित है, मेरा जुता है जपानी, धक धक धरती, चांद से प्यारी दादी माँ, दादाजी की छडी हूं मैं, मोबाईल बुरी बला, आम्ही गड्या डोंगरचे राहणार अशी गीते सादर करण्यात आली. सर्व उपस्थित पालकांनी, मान्यवरांनी, इतर सर्वांनीं विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. प्रमुख पाहुण्या मा. सौ. वसुधा नाईक यांनी आपली आठवण म्हणून प्रशालेला पितळेची समई भेट दिली.





