Breaking
आरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्रमुंबई

श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजनामृत भजन स्पर्धेत सुयश

तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी

0 4 8 2 9 7

श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजनामृत भजन स्पर्धेत सुयश

तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

अलिबाग: दि. ३१ जुलै, १ ऑगस्ट व २ अॉगस्ट २०२४ रोजी सांस्कृतिक प्रकोष्ठ, भारतीय जनता पार्टी, दक्षिण रायगड यांनी क्षात्रैक्य समाज हॉल, कुरुळ अलिबाग येथे अलिबाग व मुरुड तालुक्यातील पुरुषांसाठी भजनामृत भजन स्पर्धा – २०२४ चे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी निवृत्ती चौधरी, बाळासाहेब वाईकर, ज्ञानेश्वर खैरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

सदर भजन स्पर्धेत श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ, आवास [ पाठकआळी ] या भजन मंडळाने चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. याबद्दल सांस्कृतिक प्रकोष्ठ, भारतीय जनता पार्टी, दक्षिण रायगड यांच्यावतीने श्री सिद्धेश्वर प्रसादिक भजन मंडळ आवास [ पाठक आळी ] या मंडळाला रुपये ११,००० रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले व अभिनंदन करण्यात आले.

श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ, आवास [ पाठक आळी ] चे गायक विजयकुमार काठे व स्वर्गीय यशवंत शिंदे यांचे शिष्य भूषण माळवी, पखवाज वादक आकाश पाटील, तबला वादक ज्ञानेश्वर कदम व सर्व सहगायक यांचे अलिबाग तालुका पंचायत समिती माजी सदस्य रणजीत प्रभाकर राणे, ग्रुप ग्रामपंचायत आवासच्या सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, उपसरपंच राजन वाकडे, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच दिलखुश क्रीडा मंडळ, आवासचे अध्यक्ष सुधीर राऊळ यांनी अभिनंदन केले तसेच आवास व पंचक्रोशीतील भजन प्रेमी कडून श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ, आवास [ पाठक आळी ] यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे