0
4
8
2
9
3
लोकभ्रम
वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून
अंधश्रद्धेला देऊया मूठमाती
लोकभ्रम मोडून काढण्याचे
कार्य सर्वजण घेऊया हाती…
लोकभ्रमाचा फुगा फोडूयात
विवेकबुद्धीचा वापर करून
नकोच मनात शंका कुशंका
मांजर आडवी का समोरून….
लोकभ्रमाची अनामिक भीती
नका घालू कोणीच खतपाणी
विचार ठेवून सकारात्मक सदा
पळून जाईल भूतबाधा करणी…
सत्य आहे तेजस्वी सूर्यासारखे
ना झाकते ना नाश पावते कधी
डोळसपणे पाहणाऱ्याला देईल
साथ आयुष्यभर जीवनामधी…
वैज्ञानिक दृष्टिकोनाने मोडूया
लोकभ्रमाची समजूत खोटी
विवेकबुद्धीने लक्षात येईल
प्रगतीची तीच अडसर मोठी …
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
==========
0
4
8
2
9
3



