
0
4
8
2
9
3
मोरपीस
रिमझिम पावसात
आंब्याच्या अंबराईत
माझ्याशी खेळायला
येना तू थुईथुई नाचत
मोरा रे मोरा रे किती
सुंदर तुझे मोरपीस
नाचता पिसारा फुलवून
छान किती तू दिसतेस
पंख तुझे रंगीबेरंगी
चाल तुझी तोऱ्यात
सौंदर्य तुज भारीच
रमतोस तू निसर्गात
राष्ट्रीय पक्ष्याचा तुला
मिळाला आहे सन्मान
कृष्णाच्या डोक्यावर
शोभतो मोरपीस छान
गाईगुरांच्या शिंगावर
दारासमोरही लावतात
माझी आई सांगत असते
मोरपीसाला शुभ मानतात
सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
=========
0
4
8
2
9
3



