रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीबाबात…!!
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीबाबात…!!
रायगड जिल्हा परिषदेत शे. का, प.ची अनुपस्थिती भासणार
लेखक -बळवंत वालेकर
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: (दि १२) रायगड (पूर्वाश्रमीचा कुलाबा ) जिल्हा व शे. का. प. हे नाते ७५ वर्षाहून अधिक काळापासूनचे आता घट्ट झाले आहे. कुलाबा जिल्हा लोकल बोर्ड असताना शे. का. प. व काँग्रेस यांची सत्तास्थानासाठी जुगलबंदी पाहावयास मिळायची. हे पक्ष सत्तेत आलटून पालटून बसत असत. जिल्हा लोकल बोर्डाचे कार्यालय पेण व अलिबाग असे फिरते होते. ‘कुलाबा’ जिल्हा लोकल बोर्डाचे शेवटले अध्यक्ष शे. का. प. नेते वाय्. ए. हापीज ( B. A ) यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली.
१९६२ साली जिल्हा लोकल बोर्ड इतिहासजमा होऊन महाराष्ट्रात जिल्हा परिषदासअस्तित्वात आल्या. जिल्हा परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत ( १९६२ साली ) अविभक्त काँग्रेसला बहुमत मिळाले व अध्यक्षपद दैशभक्त दादासाहेब लिमये यांनी भूषविले. १९६७ च्या निवडणुकीत शे. का. प ला बहुमत मिळाल्यामुळे तु. ह. वाजेकर अध्यक्ष झाले. काँग्रेस – शे. का. प. आलटून -पालटून सत्तेत येत असत. हा प्रकार अनेक वर्षे चालू होता.
जि. प. चे अध्यक्ष दादासाहेब लिमये ( काॕग्रेस) तु. ह. वाजेकर (शे. का, प. ) हु. म. वांगारे (काॕग्रेस)
प्रभाकर पाटील (शे. का, प. ) सुनिल तटकरे ( काँग्रेस) प्रकाश धुमाळ (काॕ) प्रभारी) अनंत पाटील (काॕ. ) रमेश डाऊर (काॕ.) विठ्ठल लोहकरे ( काॕ, ) अब्दुल सत्तार अंतुले (काॕ. सौ. सुप्रिया पाटील(शे. का .प.) सौ. अपेक्षा कारेकर (शिवसेना) बाळाराम पाटील ( शे. का. प. ) निलीमा पाटील (शे. का. प) पंडितशेट पाटील (शे. का. प.) सौ. कविता गायकवाड (शे. का. प.ससुरैश टोकरे (राष्ट्वादी काॕ. कु. आदिती तटकरे (राष्ट्रवादी का़ँ.) आस्वाद पाटील (शे. का. प.)
योगिता पारधी या भाग्यवंतांनी जि. प. अध्यक्षपद भूषविले आहे.
राजकारण धुरंधर प्रभाकर पाटील हे पाटील पहिले अध्यक्ष. त्यांनी तब्बल ११वर्षे २ २ महिने जि. प. अध्यक्षपद भूषविले. तसेच सौ, सुप्रिया पाटील , पंडित शेट पाटील , सौ. चित्रा पाटील व अ़ँड. आस्वाद पाटील यांनाही जिल्ह्याच्या प्रथम नागरित्वाची संधी मिळाली. तसेच जि. प. चे विरोधीपक्ष नैतेपदही या कुटुंबियांनी अनेकदा भूषविले आहे .
शे. का, प, सत्तेत असो नसो या पक्षाचा वैगळाच दरारा अधिकारी व कर्मचा-यांवर होता. जिल्हा परिषदेचे विविध पक्षांचे अध्यक्ष झाले. पण जयंती व पुण्यतिथी जि, प. तर्फे फक्त प्रभाकर पाटील यांचीच साजरी होत असे. अशाप्रकारे रायगड जिल्हा परिषद व शे. का. प. हे जुळलेले समीकरण संपूर्ण महाराष्ट्र जाणत होता.
जवळपास ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर २०२६च्या जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद व १५ पँचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. शे. का. प ने पूर्ण ताकतीनिशी निवडणुका लढविल्या. युती /आघाडी या तंत्राचा खुबीने वापर केला. निवडणूक काळातील वातावरण पाहता अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शे. का. प चे सहकार्य घ्यावेच लागेल अशी परिस्थिती जाणवत होती . पण वारे वेगळ्या दिशेने वाहिले आणि अनेक दिग्गजांचे अंदाज चुकले. ५९ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत शिवसेना ( शिंदे गट) २१ सदस्य , राष्ट्रवादी ( अजित पवार गट) – १६ , भा. ज.प- १५ , शिवसेना (ठाकरे गट) ०५ व काँग्रेस* – चे ०२ सदस्य निवडून आले.
परंतु शे. का. प.ला खातेही खोलता आले नाही .१९६७ पासून , प्रशासकीय राजवट सुरू होईपर्यंत ( २०२२ पर्यंत ) अखंडितपणे शे, का, प, कडे असलेली अलिबाग पँचायत समिती वरील सत्ताही संपुष्टात आली. व पल. “पंचायत समितीचेही तसेच झाले .. “कालायतस्मै नमः काहीही झाले सत्ता बदलली तरी शे. का. प. ची अनुपस्थिती जिल्हा परिषदेत भासणारच .



