
0
4
8
2
8
4
असावा एक मित्र असा
असावा एक मित्र असा
जो स्वीकारेल जसचा तसा
काळा गोरा भेद नसावा
भिंत लांबी रूंदीची नसावी
जो वाचेल भाव चेहऱ्याचे
विचारेल मिस्कील हसत
काय झाले आज भांडली का
काय झाले गुलाब फुलतायंत
जो समजेल न सांगताच
बिनसलंय आज काहीतरी
आवाजावरून कळेल ज्याला
रित्या मनाची खोल दरी
न मागताच आणून देईल
कधी आनंदाचे पोळे
फुलवेल अंतरंगात
सदा चैतन्याचे जाळे
फक्त शारिरीक सुखाची
नसेल त्याला आस
जपेन त्याला जीवापाड
असावा एकतरी मित्र खास
सविता धमगाये
ता. जिल्हा नागपूर
======
0
4
8
2
8
4



