स्वच्छता अभियानातून प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश
अमृता खाकुर्डीकर प्रतिनिधी पुणे
स्वच्छता अभियानातून प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश
उन वन संरक्षक यांच्या सहकार्याने एकलव्य शाखेचा उपक्रम
अमृता खाकुर्डीकर प्रतिनिधी पुणे
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
पुणे.दि.13 (प्रतिनिधी) पर्यावरण विषयक काम करणा-या सर्व संस्था, संघटना आणि व्यक्ती यांना सर्वात मोठा आडथळा जाणवतो तो म्हणजे वातावरणातील प्लॅस्टिकचा भरमसाठ वापर आणि कचरा व्यवस्थापनामध्ये प्लॅस्टिकचे न होणारे विघटन.
रोजच्या वापरात प्लॅस्टिक इतके सामावलेले आहे की, ते टाळताही येत नाही आणि वापरानंतर ओला कचरा वेगळा ठेवून त्यात प्लॅस्टीक मिसळू नये, याची खबरदारीही घेतली जात नाही. अशा गंभीर समस्येवर उपाय म्हणून उप वनसंरक्षक अधिकारी यांच्या सहकार्याने गोखलेनगरच्या ‘एकलव्य’ प्रभात शाखेने लोकसहभागातून पर्यावरण जागृतीसाठी प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देऊन कच-यातील पूलॅस्टकची योग्य विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने एका भव्य स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते.
गोखलेनगरच्या वन संरक्षित “मयुरबन” या निसर्गरम्य वाटिकेची “निसर्ग पायवाट” वनक्षेत्र अधिकारी श्री ठाकरे साहेबाच्या बंगल्या पासून सुरू होऊन शंकराच्या मंदिरपर्यंत जाते. सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणा-यांची इथे भरपूर वर्दळ असते. म्हणून हा परिसर अभियानासाठी निवडण्यात आला. रविवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत सुरू झालेल्या या कार्यक्रमात रा. स्व. संघाच्या “एकलव्य” शाखेचे स्वयंसेवकांनी आणि नजिकच्या वसाहतीतल्या निसर्गप्रेमींनी उत्साहाने सहभागी होऊन एकूण ४०० किलो प्लास्टिक कचरा गोळा केला.
यात मुख्यतः प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकचे तुकडे, छोट्या तुटक्या वस्तू आणि सर्वात जास्त प्लास्टिक बाटल्या या वस्तूंचा समावेश होता. वातावरणात असे प्लॅस्टिक मिसळून पर्यावरणाची हानी होते. म्हणूनच अशा स्वचछ्ता अभियानाची आवश्यकता आहे, या जाणिवेतून सामाजिक भान जपत महिलांसह मुले व अनेक पर्यावरण प्रेमी असे एकूण ४० ते ४५ जण या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
रा. स्व. संघ शताब्दी वर्षात संघाच्या वतीने पर्यावरण, समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य व स्वतत्व बोध या पंच परिवर्तन कार्यक्रमा अंतर्गत विविध मोहिमा हाती घेण्यात येत आहेत. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गोखलेनगरच्या एकलव्य शाखेने हे ‘पर्यावरण रक्षण’ अभियान राबविले.
भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर उपाधक्ष श्री योगेश बाचाल यांनी महापालिकेची कचरा गाडी, प्लॅस्टीक गोळा करणारांसाठी हँड ग्लोज, तसेच कचरा गोळा करण्याठी बॅगा ई. साहित्य उपलब्ध करून देण्याचे मोलाचे सहकार्य केले, अशी माहिती एकलव्य शाखेचे कार्यवाह श्री. मारुती सरगर यांनी “बिनधास्त वृत्त समूह” प्रतिनिधीशी बोलताना दिली.



