
0
6
1
1
8
5
वेळ
वेळ निघून जाते कशी
कळत नाही कधी कधी
हातातून वाळूसारखी
निसटते क्षणात कधी…!!
बालपण तरुणपण नि
येतं म्हातारपण कधी
हे सारं कधी बदललं
समजत नाही कधी…!!
वेळ शिकवते जे धडे
शाळेतआहेत का कधी
वेळेचाआरसा सांगा
खोटे बोलतो का कधी..??
असे वागतात माणसे
मरणार ना कोणी कधी
मृत्यूची वेळ येता जवळ
क्षणभर थांबते का कधी..!!
वेळ थांबत नाही कुठे
कोणासाठी क्षण कधी
म्हणून वेळ असतानाच
माणूस व्हावे कधी कधी..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
6
1
1
8
5



