Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड

वळके येथे आगरी समाज संस्थेचे करिअर व AI मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 4 7 4 5

वळके येथे आगरी समाज संस्थेचे करिअर व AI मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

शिबिर विनामूल्य असून, विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

वळके (ता. मुरुड-जंजिरा): आगरी समाज संस्था (सार्वजनिक ट्रस्ट नोंदणी क्र. एफ – ००१६२३७ (RGD)) तर्फे कोएसो, नारायण कमळ्या गायकर हायस्कूल, वळके, ता. मुरूड येथे करिअर व AI मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दहावी-बारावीनंतर योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या नव्या युगातील संधी व आव्हाने समजून घ्यावीत, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिरात “स्वप्नपूर्ती : दहावी-बारावीनंतरचे लक्ष्य” या विषयावर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचे विविध पर्याय, योग्य शाखा निवड आणि करिअर नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच “AI : काल, आज आणि उद्या” या विषयावर AI चे फायदे-तोटे आणि भविष्यातील संधी यावरही माहिती दिली जाणार आहे.

या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रो. मिलिंद प्रभाकर धोदरे (जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग) उपस्थित राहणार असून, विशेष मार्गदर्शक म्हणून श्री. संदेश म्हात्रे (जे.एस.डब्ल्यू., साळाव) मार्गदर्शन करणार आहेत. सदर शिबिर शुक्रवार, दि. 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9:00 वाजता वळके हायस्कूल, वळके येथे आयोजित करण्यात आले आहे.

सर्व विद्यार्थी, पालक व इच्छुकांनी आवर्जून उपस्थित राहून आपल्या भविष्याचा योग्य निर्णय घेण्यासाठी ही सुवर्णसंधी साधावी, असे आवाहन आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाटील, उपाध्यक्ष श्री सुनिल तांबडकर आणि कार्यकारी मंडळातर्फे करण्यात आले आहे. सदर मार्गदर्शन शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी श्री संदेश म्हात्रे (94203 93054) आणि श्री इंद्रजित पाटील (94045 62479) यांना संपर्क करावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 4 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे