Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरविदर्भ

खबरदार..!!! नागपुरात गॅस सिलिंडरची साठेबाजी केली तर..?

जिल्हा प्रशासनाचा कडक इशारा; अवैध साठा आढळल्यास थेट गुन्हा दाखल

0 5 1 6 5 1

खबरदार..!!! नागपुरात गॅस सिलिंडरची साठेबाजी केली तर..?

जिल्हा प्रशासनाचा कडक इशारा; अवैध साठा आढळल्यास थेट गुन्हा दाखल

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि ११ मार्च) सध्या संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी इराण युद्धाच्या पाश्वर्भूमीवर गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. नागपुरात गॅस सिलिंडरचा अवैध साठा करून कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ. विपीन ईटनकर यांनी स्पष्ट केले की, गॅस सिलिंडरची साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल.

नागपूर शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी गॅसचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर पोलीस आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग यांच्या संयुक्त पथकांकडून विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. गॅस एजन्सी, गोदामे तसेच संशयित ठिकाणांवर अचानक छापे टाकून साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने शहरात तपासणी मोहीम सुरू केली असून गॅस एजन्सी आणि साठवणूक ठिकाणांची पडताळणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मध्यपूर्वेतील तणावामुळे काही ठिकाणी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम जाणवत असला तरी नागपूरमध्ये घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून सिलिंडर साठवून ठेवू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दररोज सुमारे वीस हजारांहून अधिक सिलिंडरची विक्री विविध कंपन्यांच्या माध्यमातून केली जाते. तसेच रिफिलिंग प्रकल्पातूनही नियमितपणे मोठ्या प्रमाणात गॅसचा पुरवठा होत असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असेही प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे