Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

झडत्या

सुरेखा कोरे ता. जि.नागपूर

0 4 8 2 9 3

झडत्या

चक चाळा बैल बहाडा
शेतकरी भोळा सर्जा चा लळा
आला पोळा वाहीनतोळा
कोणाचा गा ..कोणावर डोळा
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव…

गावाच्या आखरावर
ठेवली अटाशी मटाशी…
नको जाऊ गा.. तिच्या वाट्याशी
वाट्याशी जाऊन पडशील फशी
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव…

आखरावर उभे ढोरकी बल्की
आखर कोणाचा गा..गावच्या धन्याचा ….
गाव कोणाचा ढोरक्या बलक्याचा
ढोरकी बल्की कोण..बालगोपालांचा
सखा कृष्ण.. आणखी कोण..
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव….

देवा शेतकऱ्याला कर सुखी
करू नको कधीही दुःखी
येऊ नको देऊ डोळ्यात पाणी
ठेव तुझ्या.. गा… नावाची बानी
सान थोर मिळूनी करतो विनवनी
..रे शंभो शंकरा…
एक नमन गौरा पार्वती
हर बोला हर हर महादेव…

सुरेखा कोरे
ता. जि.नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे