“घरोघरी आणि समाजात एकता दिसावी” – मैत्रेयी शिरोळकर
एकता दिवाळी अंक प्रकाशन समारंभ साजरा
“घरोघरी आणि समाजात एकता दिसावी” – मैत्रेयी शिरोळकर
एकता दिवाळी अंक प्रकाशन समारंभ साजरा
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे.(दि.24ऑक्टो) (प्रतिनिधी): ” विविध चवींचा वैचारिक फराळ देणारा एकता मासिकाचा अंक बुध्दीला खाद्य पुरवणारा असून भारतीय राष्ट्रीय विचार सहजतेने पेरणारा असल्याने एकताचा हा अंक घरोघरी असावा आणि समाजातही सर्वत्र एकता दिसावा, त्यासाठी अंक दिवाळीभेट म्हणून देण्याची प्रथा सुरू करावी. असा अंकभेट देण्याचा प्रयोग आम्ही घरी आणि संस्थेमध्ये नेहमी करतो, तसाच आपणही सर्वांनी करावा”, या शब्दात राष्ट्र सेविका समितीच्या बौध्दीक प्रमुख श्रीमती मैत्रेयी शिरोळकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
एकता मासिक दिवाळी अंक प्रकाशन समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.श्याम भुर्के होते. व्यासपीठावर एकता मासिकाचे अध्यक्ष रवींद्र घाटपांडे,संपादक सौ.रूपाली भुसारी आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एस.के, जैन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिवाळीअंकाचे प्रकाशन करण्यात आले. उत्कृष्ट अंक निर्मितीबद्दल एकता परिवाराची प्रशंसा करून दिवाळीअंकाच्या लेखकांचे सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रवींद्र घाटपांडे यांनी एकता फाऊंडेशनची भूमिका मांडली, संपादक रूपाली भुसारी यांनी अंकातील मजकूराचा थोडक्यात परिचय करून दिला. प्रा.श्याम भुर्के यांनी अध्यक्षीय समारोप करताना अनेक मनोरंजक किस्से सांगून वातावरणात विनोदाची शिंपण केली. कार्यक्रमास मान्यवर लेखक, कवी व कार्यकर्ते उपस्थित होते.



