ई-पेपरकवितादेश-विदेशनागपूरबीडमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
माझ्या प्रत्येक क्षणात तू हवास
शर्मिला देशमुख घुमरे
0
4
8
2
9
7
माझ्या प्रत्येक क्षणात तू हवास
माझ्या प्रत्येक क्षणात तू हवास
माझी परछाई बनून
प्राजक्ताचे फूल मी
तू जावास सुगंध दरवळून
माझ्या प्रत्येक क्षणात तू हवास
हात हाती घेऊन
ऊन सावलीचे खेळ चालतील
चालायला खंबीर साथ देऊन
माझ्या प्रत्येक क्षणात तू हवास
ह्दयात तुझ्या मला ठेवून
घेता मी गगनभरारी
माझ्या पंखातील बळ बनून
माझ्या प्रत्येक क्षणात तू हवास
आनंदाचे क्षण जगण्या
माझ्या चेहऱ्यावरील आनंद
तुझ्या हृदयात कोरण्या
माझ्या प्रत्येक क्षणात तू हवास
माझ्या अश्रूंचा खांदा बनून
एकच क्षण पुरेसा समजावण्या
डोक्यावर प्रेमळ हात फिरवून
शर्मिला देशमुख घुमरे
जिल्हा बीड
0
4
8
2
9
7



