ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरवर्धाविदर्भसाहित्यगंध
पापाचा हव्यास
डॉ. बालाजी राजूरकर ता. हिंगणघाट जि. वर्धा

0
5
3
4
0
0
पापाचा हव्यास
का लागला हव्यास तुला
पैसा मिळविण्याचा?
का निवडला मार्ग सांग
अवैध विनाश्रमाचा?
खायला नव्हता का घास,
का ओढतोस दुसऱ्याचा?
कसे जमले पाप करणे,
मार्ग धरलास मरणाचा?
पापाने कमविलेले धन
चांगल म्हणणार नाही,
पापाची ही कमाई तुझ्या
पिल्लांना फलणार नाही.
माणसासारखा वाग जरा,
माणूस समज दुसऱ्याला,
नाहीतर शेवटी माणूसही
मिळणार नाही मरणाला.
जगावे कसे, काय खाव
चिंतेत आयुष्य जळले,
अशांच्या लेकरांचा शाप
तुझ्या पाठीशी उभा राहिले.
डॉ. बालाजी राजूरकर
ता. हिंगणघाट जि. वर्धा
========
0
5
3
4
0
0



