Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजन

आगरी समाज संस्थेच्या वतीने पारंपारिक हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 6

आगरी समाज संस्थेच्या वतीने पारंपारिक हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग : आगरी समाज संस्था आयोजित पारंपारिक हळदीकुंकू समारंभ रविवार, दि. 18 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता आनंदनगर येथील श्रीमत् अथर्व फिटनेस सेंटर येथे अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला आगरी समाजातील माता, भगिनी मोठ्या संख्येने उस्फूर्त प्रतिसाद दिला.

याप्रसंगी आगरी समाज संस्थेच्या सभासद तथा अलिबाग नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ सुषमा पाटील तसेच उपनगराध्यक्षा सौ. मानसी म्हात्रे आणि चिंचवली ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. दीप्ती पाटील यांचा आगरी समाज संस्था महिला आघाडीच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात वाण म्हणून महिलांना रोपं देण्यात आली. याद्वारे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आगरी समाज संस्थेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली. या उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

हा संपूर्ण कार्यक्रम महिलांनीच आयोजित केला असून त्याचे सुयोग्य नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी सौ. दिपश्री पाटील, सुप्रिया ठाकूर, दर्शना पाटील, दीप्ती पाटील, प्रीती पाटील, प्रमिला शेळके, प्रणिता पाटील, रेश्मा म्हात्रे व जागृती पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांचे एकत्रीकरण, परस्पर स्नेहवृद्धी, ओळख व संवाद वाढवणे या उद्देशाने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून आगरी समाज संस्थेच्या कार्यात महिलांचा सक्रिय सहभाग अधोरेखित करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे