Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्ररायगड

जे. एस. एम. महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 7 8 9 8

जे. एस. एम. महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज मिडीया

अलिबाग, (दि. 3 ऑगस्ट) जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि 5 बटालियन एन. डी. आर. एफ. पथक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी एन. डी. आर. एफ.चे पोलीस इन्स्पेक्टर श्री. सुशांतकुमार सेठी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. निळकंठ शेरे, उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, कार्यक्रम अधिकारी डॉ. पंकज घरत तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे 167 स्वयंसेवक उपस्थित होते.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. Adv. डॉ. गौतम पाटील आणि प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी शिबिरासाठी शुभेच्छा देत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होते, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. प्रविण गायकवाड यांनी प्रास्ताविक करत शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आत्मसात करून समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखावी आणि संकटकाळात मदतकार्य करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिबिराचे प्रमुख प्रशिक्षक एन. डी. आर. एफ.चे पोलीस इन्स्पेक्टर श्री. सुशांतकुमार सेठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचे स्वरूप, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी, प्रथमोपचाराची मूलभूत तत्त्वे तसेच बचावकार्याच्या विविध पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बचावकार्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत विविध बचाव तंत्रांचा अनुभव घेतला.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूकता निर्माण होऊन संकटकाळात धैर्याने व प्रभावीपणे कार्य करण्याचा आत्मविश्वास वाढल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पंकज घरत यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 8 9 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे