ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरमहाराष्ट्रसाहित्यगंध
महाराष्ट्र माझा
डॉ. पद्मा जाधव-वाखुरे छ. संभाजीनगर

0
5
6
8
3
2
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा महान
थोर संतांची ही खाण
खुलविले अक्षरांगण
अभंग विचारांची देणं ..१
महाराष्ट्र माझा महान
आदर्श इथं शिवरायांचा
स्वराज्य सुराज्य निर्माण
पथ निर्मिला न्यायनीतीचा ..२
महाराष्ट्र माझा महान
फुले शाहू आंबेडकरांचा
कित्ता ज्यांनी गिरविला
न्याय्य समता प्रस्थापनेचा ..३
महाराष्ट्र माझा महान
जिजाऊ अहिल्या सावित्रीचा
स्त्रीजातीची वाढविली शान
इतिहास घडविला महानतेचा ..४
या मातीचे पाईक होऊनी
मिळून सारे जपुया अस्मिता
कार्य करूया सर्वस्व अर्पूनी
भूमी आहे ही भूषण भारता
भूमी आहे ही भूषण भारता ..५
डॉ. पद्मा जाधव-वाखुरे
छ. संभाजीनगर
0
5
6
8
3
2


