मावशी
शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर

मावशी
जिव्हाळ्याची आणि जीवाला जीव देणारी मावशी म्हणजे दुसरी आईच असते. अनेक नानाविध पात्र वटवणारी सुख दुःखात सामावून घेणारी, वात्सल्य प्रेम सिंधू जपणारी. खेळ मांडल्या क्षणात उन्हात राहून सावली देणारी जणू मायच असते. माझ्या आईची लहान बहीण म्हणजे माझी मावशी. तिचा स्वभाव खूप मायाळू ,प्रेमळ होता. तिला दोन मुली व दोन मुले. सा-यांचे लग्न झाले. सासरी लेकी सुध्दा आनंदी.सर्व जे ते लेकरा बाळा सोबत सुख समाधाने राहत आहे. तिचा एक मुलगा म्हणजे माझा मावस भाऊ पुण्याला कंपनीत आहे. तो आपल्या कुटुंबासह राहतो. त्याचा प्रपंच चांगला चालला आहे. गावाकडे एक भाऊ शेती काम करतो. वडीलाला म्हणजे काकाला शेती कामात हातभार लावतो. काकाने खूप काबाड कष्ट करून काळी कसदार सुपीक दोन एकर जमीन खरेदी केली.लेकरासाठी धान्याची पर्वणी उभी केली. गाडी बैल ,बारदाणा ,सोबतच दुसऱ्याची शेती पण कसायचे.अजून दोन पैसे संसारात उभे करायचे.काकाची मोठी लेक व जावई कामानिमित्त त्यांच्या गावी आले. काम मिळत मिळत तेथील रहिवाशी झाले व तेथे स्वतःचे घर थाटले.
मावशीची दुसरी लेक अगदी तीन किलोमीटर अंतरावर दिलेली आहे.पण तिचा नवरा दारू पिऊन खूप मारझोड करायचा ,भरपूर समजावून सांगितले ,तरीही त्याच्यावर काही फरक पडायचा नाही.सध्या ती माहेरी स्वतःचे घर बांधून लेकरा बाळा सोबत जगते.तिचा मुलगा कमवता असून आई व भांवडाना पोसत आहे. बहीण ,मावशी संग राहायची तिला ही हातभार लावायाची.आता मावशीचं वय 70 वर्ष झालेलं असेल. काटक ,उंच धिपाड,गोजिरवाणी, प्रेमळ स्वभाव होता. शेजारी पाजारी बाया म्हणायच्या
शेंवता आज दिसली नाहीस कुठं गेलतीस विचारपूस करायच्या. तिचा स्वभाव खूप प्रेमळ आणि कोमल होता. कोरोनाच्या काळात मावशीची तब्येत ठिक नव्हती .सकाळी जिल्हाच्या ठिकाण नेलं,सपण सगळे दवाखाने बंद. कारण कोरोनाने थैमान माजवला होत.जो तो घरी बसून जीवन जगत होता.
निर्मनुष्य गाव रस्ते, जागोजागी पोलीसांच्या छावण्या होत्या. फक्त सरकारी दवाखाना तेवढा चालू होता. नाईलाज झाला होता मावशीला सरकारी दवाखान्यात ऐडमीट केलं .तब्येत साथ देत नव्हती .पाच ते सहा दिवस दवाखाना केला सातव्या दिवशी मावाशीची प्राणज्योत मावळली. घरी आणलं पण अंत्यसंस्काराला मोजकेच माणसे होती. मावस भाऊ पुण्याला होता .त्याचा जीव कासावीस झाला होता .त्याचा जीव भांड्यात पडला, त्यालाही शेवटच्या क्षणी येता आले नाही .लाईव्ह अंत्यसंस्कार दाखवला तो फार आतून खचून गेला होता. धाय मोकलून रडू लागला नियती आडवी आली. दुस-या दिवशी परवाना काढून मावशीच्या राखेला हात लागला…!!
शिवाजी नामपल्ले
अहमदपूर जि.लातूर
=========





