
0
4
8
2
8
4
स्वप्नभूमी
माझ्या वीराण आयुष्यात
तू प्रितसर बनूनी आली
.. आणि माझी स्वप्नभूमी
आज जणू नंदनवन झाली..//
आशा आकांक्षांची बीजे
ज्यातून अलवार अंकुरली
आणि अनामिक हूरहूरीने
अवघी काया झंकारली.. //
माझ्या मनःपटलावरती
उमटले तुझे पदन्यास
ना जाणो किती काळ
ज्याची मला होती आस…//
स्वप्नभूमीचा कण कण
सखे तुझ्याने मोहरलाय
सरला शिशिर वेदनादायी
या ह्रदयी वसंत बहरलाय.. //
चैतन्यदायी प्रित गंधात
माझे हरपून गेले देहभान
जणू संग तुझा परिसाचा
जीणे झाले सुवर्णासमान.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
4
8
2
8
4



