Breaking
ई-पेपरकविताबीडमराठवाडासाहित्यगंध

ज्ञानपंढरीचे आम्ही वारकरी

राजश्री मिसाळ ढाकणे ता. जि. बीड

0 5 7 4 4 8

ज्ञानपंढरीचे आम्ही वारकरी

ज्ञानपंढरीचे आम्ही वारकरी
देवी शारदेची ओवाळू आरती
हाती पुस्तक, पेन आणि वही
हीच आमुची खरी संपत्ती…!!

गुरुजन आमचे विठ्ठल झाले
ज्ञानामृताचे एकमेव दाते
संस्कारांच्या दुर्मिळ वाटेवर
गुरूशिष्याचे पवित्र नाते…!!

लेखणी आमुची टाळ झाली
वही आमची झाली वीणा
कविता नि पाढयाच्या गजराने
उजळते आमची जीवनरेषा…!!

शिस्त श्रम अन् जिद्दीने
स्वप्नांची घेतो उंच भरारी
ज्ञानदीपाच्या तेजकिरणांनी
नष्ट होते अज्ञानाची खोल दरी…!!

मैत्री प्रेम सहकार्य घेऊन
बाल दिंडी आमुची सजली
पावलागणिक नित्य नवी
यशाची मुळे खोलवर रुजली…!!

ज्ञानपंढरीच्या या वारीत
भारतभूमीचा वाढवू मान
आजचे आम्ही बाल वारकरी
उद्याचे नागरिक सुसंस्कृत सुजाण…!!

राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जि. बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 4 4 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे