0
4
8
2
9
7
भेद मिटवू
भेद मिटवू चला सारे
नकोत कलह हेवेदावे
प्रेमाचे घालूनी बंधन
मतभेद दूर व्हावे ||१||
ऋणानुबंध जपूया आपले
आता मनामनांतून आपण
सहृदय देऊ या चला
आता एकमेकांस अलिंगन ||२||
भेदाची भिंत उभी करावी
कशास आपल्याच भोवती
आपणच जर आहोत
एकमेकांचे नित्य सोबती ||३||
गैरसमज करील विनाश
आपल्यातील नात्यांचा
भेद मिटवू चला तर मग
विजय होईल सत्याचा ||४||
मतभेद नको,नको असूया
नकोच वृथा अभिमान
भावनांचा आदर करू चला
राखू परस्परांचा मान ||५||
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर, जि.पुणे
===========
0
4
8
2
9
7



