सिर्सी येथे रमजान ईद उत्साहात साजरी; गुलाबाचे फूल देऊन पाहुण्यांचे स्वागत
प्रतिनिधी: अखिल रोडे, उमरेड/नागपूर

सिर्सी येथे रमजान ईद उत्साहात साजरी; गुलाबाचे फूल देऊन पाहुण्यांचे स्वागत
प्रतिनिधी: अखिल रोडे, उमरेड/नागपूर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
उमरेड / सिर्सी: (दि २२) येथील जामा मशीदमध्ये रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.
शांततेचा संदेश आणि स्वागत याप्रसंगी मौलाना हाफिज मुक्कदस रेयान यांनी उपस्थितांना शांतता आणि बंधुभावाचा उपदेश केला. मशिदीच्या वतीने अध्यक्ष शकील खा पठाण आणि सचिव हनीफ मौला शेख यांनी आलेल्या पाहुण्यांचे गुलाबाचे फूल देऊन जंगी स्वागत केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अतुल नारनवरे, अमोल कोटेवार पोलिस कर्मचारी बेला पोलिस आणि गणेश बालपांडे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशासनाचे सहकार्य ईदचा सण शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व बांधवांनी कब्रस्तान येथे जाऊन प्रार्थना (दुआ) केली.
उपस्थित मान्यवर या सोहळ्याला अफसर पठाण, जमील तुर्रक, अबीदिन अगवान, आशिक अगवान, गणी भाई, इम्रान पठाण, तोसिफ अगवान, रोशन छवारे, नासिर शेख, नाहिम पठाण, एजाज पठाण, अय्युब अगवान, कादर अगवान, रियाज अगवान, अख्तर अगवान, तोहसीफ, दानिश शेख, रहीम पटेल, जाकीर अगवान, समशेर अगवान, सामसूद्दीन शेख, हासीम शेख, सलमान पठाण, रहमान पठाण, युनूस शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.



