
स्वातंत्र्या
स्वातंत्र्या तू फुलत रहा
निळ्या आकाशी समतेचे वारे
घेऊन तू असाच डौलत रहा
अभिमानाने डौलत रहा
लागले तुला नाम अनाम वीरांचे
हात बलिदान करुनी केले तुला मोकळे
तू स्वातंत्र्य समता बंधुभाव घेऊन
निळ्या आकाशी डौलत रहा
गांधी नेहरू भगतसिंग नेताजी
झटले ते स्वातंत्र्यासाठी कलाम
तू डगमगत असताना सावरले त्या
मनमोहन सिंगांनी प्रणाम या थोरांना
या मातीला आहेत अनेक परंपरा
नि संस्कृती जो आला तो इथला
होऊन गेला विविधतेतून एकता
जपली या मातीने सामावले प्रत्येका
मिळू दे प्रत्येक हाताला काम
दे तू प्रत्येका अन्न वस्त्र निवारा
लाभो साऱ्यांना सुख शांती नि
समाधान नको भेदाभेद कुठला
होऊ दे ही धरती सुजलाम सुफलाम
येऊ दे वैभवाचे दिवस आहेत
आशीर्वाद त्यांचे ज्यांनी सोसल्या
तुजसाठी मरण कळा
हे स्वातंत्र्या निळ्या आकाशी
समतेचे वारे घेऊन तू असाच
अभिमानाने डौलत रहा समतेचे
गाणे गात रहा गाणे गात रहा
गजवंती सुभाष विघ्ने
ता. बडनेरा, जि.अमरावती



