0
4
8
2
9
0
पाऊस माझे नाव
कधी रपरप तर कधी
कधी संततधार पडतो
मीच मृगाचा पाऊस आहे
आहे ज्याची तो वाट पाहतो ॥
शेतकरी वाट पाहताना
पाहताना मला लाज वाटे
पण काय करु ढगांनीच
ढगांनीच पेरलेत काटे ॥
श्रावणात बरसणारा मी
मी सर्वांना तेंव्हा आवडतो
वळीवाचा लागलाय भारी
भारी कलंक मला भोवतो ॥
नदी,नाले,तलाव,सागर
सागर जलाशयानी भरतो
माझे कर्तव्य पार पाडता
पाडता कधी मीच हरतो ॥
परोपकारी ही वृत्ती माझी
माझी सेवा लौकिकाचा ठाव
भिजवितो आनंदाने चिंब
चिंब रे पाऊस माझे नाव ॥
दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
जि.धाराशिव
0
4
8
2
9
0



