0
4
8
2
9
7
तन मन
विठ्ठला पवित्र माझं मन
लागले तुझेच रे ध्यान!
करतो सदा शुभ चिंतन
रमलो आता मनातुन!
वाचली मी पोथी पुरान
विसावले ठायी हे मन!
आळवी अभंग कंठातून
वेधले लक्ष डोळ्यातून!
करतो गावी मी भजन
मिळते पुण्य पदरी छान!
प्रबोधन करी किर्तनातून
सफल झालंय जीवन!
रमतो कधी मी शेतातून
वहाते पाणी मोटेतून!
मोडतो दरी तुझे चिंतन
सुखावले माझे रे मन!
तुझ्या मंदिरी अंतर्ध्यान
व्हावे या चरणी विलीन!
भोगले दुःख रे कष्टातून
नाही सोडले मी चिंतन!
अर्पिले तुलाच हे जीवन
विसरली भूक रे तहान!
मुख शुद्धीला पसायदान
करा विठ्ठलाचे पारायण!
अशोक महादेव मोहिते
बार्शी,जिल्हा सोलापूर
===========
0
4
8
2
9
7



