Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

गोरख अहिरे यांना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते रफी इंटरनॅशनल ॲवाॅर्ड

वसुधा नाईक प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

गोरख अहिरे यांना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते रफी इंटरनॅशनल ॲवाॅर्ड

वसुधा नाईक प्रतिनिधी

पुणे : 26 फेब्रुवारी 2025
ज्येष्ठ गायक गोरख अहिरे यांना नुकताच सा म्युझिकल इंटरनॅशनल संस्थेतर्फ विश्वविख्यात शीळवादक, गायक आणि अभिनेते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते’ मोहम्मद रफी इंटरनॅशनल ॲवाॅर्ड’ प्रदान करण्यात आला.

दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या जिल्हा कार्याध्यक्ष सोनिया गोळे ‘अध्यक्षस्थानी ‘होत्या. सौ.वैशाली अहिरे , शिवानी अहिरे व्यासपीठावर होत्या. मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

गोरख अहिरे यांनी जवळपास
चार दशकं मोहम्मद रफी यांची
गाणी सादर करुन रसिकांमधे
लोकप्रियता मिळवल्या बद्दल
त्यांना मोहम्मद रफी इंटरनॅशनल ॲवाॅर्ड प्रदान करण्यात आल्याचे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी
सांगितले.” मोहम्मद रफी प्रत्त्येक रसिकाच्या हृदयात आहेत.शेकडो वर्ष उलटली तरी रसिकांचे रफींच्या गाण्यांविषयीचे प्रेम ओसरणार नाही ” असे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आपल्या प्रमुख भाषणात सांगितले.

या सोहळ्याचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनितकालिकाच्या 654 व्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. पुरस्काराबद्दल गोरख अहिरे यांनी रसिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. गोरख अहिरे यांनी जाने वाले जरा मुडके देख (दोस्ती ), तू गंगा की मौज मे जमुना की धारा(बैजू बावरा ) खोया खोया चाॅद (कालाबाजार) तू कहाॅ ए बता (तेरे घरके सामने ) इत्यादी गाणी सादर करुन रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनीही चौदहवी का चाॅद हो (चौदहवी का चाॅद) चाहुंगा मै तुझे साॅज सवेरे (दोस्ती )आदि गाणी सादर करुन रसिकांची मने जिंकली.तसेच डाॅ.घाणेकर यांनी रफी यांची कुंडली आणि सहीचे प्रभावीपणे विश्लेषण केले.

सोहळ्याच्या अध्यक्ष सोनिया गोळे यांनी अध्यक्षीय समारोप केला.सध्याच्या काळात एका कलाकाराने दुस-या कलाकाराला कशी दाद द्यावी हे मोहम्मद रफी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे , असे प्रतिपादन सोनिया गोळे यांनी केले. सुप्रसिध्द गायक विनोद कांबळे , वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष वसुधा नाईक, संगीतकार दिग्दर्शक विकास कुचेकर , डाॅ.पी.डी.साबळे , संगीत संयोजक शैलेश येवले , संतोष खवळेकर ,सुभाष भागवत , कविता जावळे , मनोज साळवे युवराज कलवले, मुरलीधर झोंबाडे , माया गायकवाड, संजय परदेशी, विवेक राऊत आदि विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे