Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखमहाराष्ट्रमुंबई

खरंच..! “महेश म्हात्रे सर” म्हणजे एक अजब रसायन ..

0 4 8 2 9 0

खरंच..! “महेश म्हात्रे सर” म्हणजे एक अजब रसायन …

माझ्या मनाला महेश म्हात्रे सरांविषयी पडलेले प्रश्न

* विधात्याने भरभरून देवूनही या माणसाच्या अंगी कुठून आली? एवढी मोठी नम्रता,माया,ममता..

*मुंबई सारख्या मायानगरीतही असतात का ?रक्ताच्या नात्यापलीकडील नाती.

* पद,पैसा,प्रतिष्ठा, तसेच ईश्वरी देन म्हणजेच शरीरयष्टी, सौंदर्य या सर्वांचा अंगी संगम असूनही या महान व्यक्तीमत्वाचे पाय जमीनवरच कसे ?
* केंद्रीय मंत्री, विविध राज्यांतील मंत्री यांच्या सोबत हवाई दौरे करणारा व्यक्ती एवढा कसा साधा माणुस?

अचानक एके दिवशी खुप दिवसा नंतर मुंबई तील मित्राचा फोन आला ,तो मंत्रालयात एका चांगल्या हुद्यावर गलेलठ्ठ पगारावर नोकरी करित होता,पण त्याचे शेड्युल मात्र खुपच बिझी म्हणून मी त्यांना डिस्टर्ब नको म्हणून कधीही फोन करित नव्हतो.मुंबईतील माणसं वेळेला खुपच महत्त्व देतात. त्यांच धक्काधक्कीच जिवन मी खुपच जवळहून पाहीलेलं असल्यामुळे मला त्यांच्या या सर्व गोष्टीची जान होती. त्यामुळे मी माझ्या मुंबईतील कोणत्याही मित्राला बोलायचे झाले तरी पहीले त्यांच्या मोबाईलवर मॅसेज टाकायचो, त्यांना वेळ मिळाली की, मग मला ते फोन करून बोलायचे. नेहमीच्या सवयी प्रमाणे मी मंत्रालयात गेलो की ,मात्र वेळातला वेळ काढून नक्कीच माझ्या मित्राना भेटायचो. नेहमी प्रमाणेच त्याना मॅसेज केला की,मी मुंबईत आहो म्हणून आणी उद्या सकाळी तुझ्या ऑफिस टाईमला तुला भेटण्यासाठी मुद्दामहून येतोय, तेंव्हा त्याचा लगेच रिप्लाय आला की,साॅरी यार अधिवेशन असल्यामुळे माझ्याकडे वेळ अपुरा आहे.तुझे काही मंत्रालयात काम असेल तर सांग मी करतो. आपण निवांत सायंकाळीच ठिक 8 वाजता भेटूत आणी बाहेर डिनर करूत. खुप दिवस झाले आपण भेटलोच नाही, तु मला भेटल्या शिवाय जायायचे नाही.मी म्हणालो ठिक आहे, काहीही हरकत नाही.दररोजच्या वेळे प्रमाणे मी सकाळीच 5 वाजता फ्रेश होऊन पायी फिरण्याची आवड असल्यामुळे नरिमण पाईंटकडे निघालो.एकदोन तास निवांत समुद्राच्याकडेला शांत बसून, मन तृप्त होई पर्यंत, समुद्राच्याकडेला बसून राहीलो. कारण मुंबईत जेंव्हा जेंव्हा मी गेलो तेंव्हा तेंव्हा समुद्र च्या कडेला एखादा तरी तास निवांत बसल्याशिवाय मला करमतच नाही. सांगायचे तात्पर्य म्हणजे मला मुंबईला गेल्यासारखे वाटतच नाही. कारण मला समुद्राची प्रचंड आवड तासनतास त्याच्या लाटेकडे एकाग्र चिताने बघतच राह्याचे, समुद्राच्याकडेला बसलो की,मला बालपणीच्या शाळेतील कविता आठवायच्या
आवडतो मज अफाट सागर,अथांग पाणी निळे…
निळ्या जांभळया जलात केशर सायंकाळी मिळे…
फेस फुलाचे सफेद शिंपीत वाटेवरती सडे..,
हजारो लाटा नाचत येती, गात किणा-याकडे..
मऊ मऊ रेतीत ,कधी मी खेळ खेळतो किती..दंगल दर्यावर करणा-या ,या वा-याच्या संगती.
संथ सावली दिसती तेंव्हा क्षितिजावर गलबते.,देश दुरचे बघावयाला जावेसे वाटते.तुफान केंव्हा भांडत येई, सागर ही गर्जतो त्यावेळी मी चतुरपणाणे दुर जरा राहातो .
खडका वरून कधी पाहतो, मावळणारा रवि,ढगाढगाला फुटते तेंव्हा सोनेरी पालवी..
प्रकाश दाता जातो जेंव्हा जलातखालच्या घरी, नकळत हात माझे जुळोनी येती छातीवरी…
या कुसुमाग्रजाच्या कवितेच्या ओळी नकळतच माझ्या ओठांवर येणार म्हणजे येणारच..
बिच कडून नंतर टॅक्सीने ज्या हाॅटेलमध्ये थांबलो होतो त्या हाॅटेलच्या दिसेने निघालो पण वाटेने मात्र एक विचार मनात घर केलेला होता .तो म्हणजे जेष्ठ विचारवंत, प्रख्यात राजकिय विश्लेषक, आयबीएन लोकमत चे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर यांच्या भेटी विषयीचा मी लगेच ठाणे जिल्ह्याचे तेजपुंज न्यूज चॅनलचे माझे जिल्हाप्रतिनिधी अतुलजीना काॅल केला अतुलजी तुमचे मामाश्री म्हात्रे सर यांची नी माझी भेट होईल का? सर मी मामाना विचारून लगेच तुम्हाला कळवतो ,मी म्हणालो ठिक आहे चालेल अतुलजी, म्हणून काॅल कट केला ,नी टॅक्सीतून उतरून ज्या मिडटाऊन हाॅटेलला मुक्कामी थांबलो होतो, त्या हाॅटेल च्या लिफ्ट मध्ये पाय टाकताच अतुलजीचा काॅल आला. सर ,माझे मामाशी बोलने झाले त्यानी आज तुम्हाला भेटीची वेळ सांगतोय म्हणाले, तुम्ही सरांच्या पर्सनल नंबरवरती काॅल ठिक 11 वाजता करा. मी म्हणालो ओके, अतुलजी नी फोन ठेवला .मी घाईघाईत फास्ट स्नान, नाष्टा केला .आणि ठिक 11 वाजता म्हात्रे सरांना काॅल केला सरांनी लगेच माझा काॅल रिसिव्ह केला नि म्हणाले बोला अरविंदजी आपण कसे आहात.., आणी कुठे आहात मी म्हणालो सर मी ठिक आहो ईथेच आहे मुंबईत थांबलो सर आपली भेट होईल का? सर म्हणाले नक्कीच होईल पण तुम्ही दुपारी मला तिन च्या नंतर काॅल करा मी जिथ कुठे असेल तिथ आपण भेटूत मी म्हणालो ,ठिक आहे सर ,नंतर मी मुंबा देवीचे दर्शन घेवून सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले आणी आझाद मैदानाकडे निघालो कारण तिथे माझ्या तालुक्यातील मौजे हडसणी येथील एक युवक मराठा समाजाच्या आरक्षण व ईतरही मागण्या संदर्भात आमरण उपोषणास गेल्या दहाबारा दिवसापासून बसलेला मित्र होता,त्याना भेटायला निघालो असता , आमदार निवासपाशी सामाजिक चळवळित काम करणारे माझ्याच तालुक्यातील ,भागवत देवसरकर भेटले .ते म्हणाले दाजी चहा घेवूत. मी म्हणालो, दाजी नका जरा मराठा आरक्षण विषयक उपोषणास बसलेल्या आपल्या तालुक्यातील दता सुर्यवंशी नामक उपोषणकर्त्यास भेटायला निघालो .तुम्हाला वेळ असेल तर बसा गाडीत म्हणताच क्षणी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळणारे भागवत देवसरकर बसले. आम्ही दोघे आझाद मैदान येथे उपोषणस्थळी गेलो सुर्यवंशी पाटील हडसणीकर यांची अर्धाएक तासाच्या भेटी दरम्यान त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.त्याना विचारले की,तुमच्या उपोषणाचा आजचा बारावा -चौदावा दिवस तुम्हाला विकनेसपणा वाटत नाही का? तुमच्या पोटात अन्नाचा कणही नसेल ना?त्यावर ते म्हणाले तसे नाही दररोज दहा ते पाच वाजे पर्यंतच उपोषणास बसण्याची शासनाची परवानगी आहे.त्यामुळे मी शासनाने खालून दिलेल्या नियमाचे पालन करतो. माझ्या मनात विचारांचे काहूर सुरू झाले. पुन्हा न राहवल्यामुळे मग तुम्ही कधी उपोषण सोडणार त्यावर ते म्हणाले हदगांव तालुक्यातील भाटेगाव-उमरी येथून सायकलवर प्रवास करून ईंगळे नांवाचे गृहस्थ माझ्यासाठी आले त्यांच्याच हाताने मला उपोषणाची सांगता करावयाची आहे.मला कोणत्याही राजकीय नेत्याच्या हस्ते उपोषण सोडायचे नाही.आदीसह ईतरही बाबीवर चर्चा झाली.त्यानंतर तिथून निघून मी व भागवत देवसरकर मंत्रालयाच्या दिशेने निघालो.म्हात्रे सरांना फोन करण्याचे विसरून गेलो. मला खुप वाईट वाटले की मुंबईतील माणस वेळेला खुपच महत्त्व देतात आणी मी ,तर सरांना फोन करण्याचे विसरून गेलो . मला पुन्हा फोन करण्याची माझीमलाच लाज वाटत होती. मी खुपच नाराज झालो.माझमलाच खजील झाल्यासारख वाटत होत. लगेच म्हात्रे सरांचा काॅल आला अरविंदजी आपण आता कुठे आहात मी म्हणालो सर साॅरी मी तिन वाजता विसरून गेलो आपणास काॅल करायचे, सर म्हणाले काही हरकत नाही. मी आता दादराला आहे तुम्ही किती वाजेपर्यंत येवू शकता माझ्याकडे मी म्हणालो सर मी तासाभरात तुमच्यापाशी पोहचतो .सर, म्हणाले ठिक आहे तुम्ही निवांत या आणी आज आपण बाहेर हाॅटेलला छान पैकी डिनर करूत .मला खुपच आनंद झाला आणी एवढ्या मोठ्या उंचीवर असलेल्या महान व्यक्तिमत्वाने माझ्या सारख्या ग्रामीण भागातील साध्या मानसाला थेट जेवनाचे आमंत्रण द्यावे हे मला स्वप्नातही वाटले नाही.मी दादरकडे लोकलने निघालो .मंत्रालयातील भोसले नांवाच्या मित्राला सांगीतले आपण उद्याला भेटूत तो म्हणला ठिक आहे.तेंव्हा माझ्या मनात म्हात्रे सरांविषयी अनेक विचार सुरू झाले या विचारात दादर स्टेशन केंव्हा आले. ते कळले सुध्दा नाही. लगेच लोकल रेल्वे मधून दादर स्टेशनवरती उतरलो नी सरांना काॅल केला .सर मी स्टेशन वर पोहचलो सर म्हणाले ,तुम्हाला दादर मधील कोणते ठिकाण माहीत आहे. मी म्हणालो, सर तुम्हीच सांगा मी कुठे ये ते?,सर म्हणाले शिवाजी पार्क जिमखाना माहीत आहे का? एकदम शिवसेना भवनाच्या बाजुला मी म्हणालो हो सर माहीत आहे.या मग, तिथे आले की, मला काॅल करा म्हणलो ठिक आहे.लगेच मी टॅक्सी केली नी दादर येथील शिवाजी पार्क जिमखान्यासमोरल मुख्यगेटपासी सरांची वाट पहात उभा होतो.लगेच सरांचा काॅल आला. आपण कुठे आहात ,मी म्हणालो सर जिमखान्याच्या एकदम समोरील गेटपासी मला बोलत बोलत सरांची वाॅकिंग चालु होती. माझ्या एकदम लक्षात आले कि,सर सकाळ,संध्याकाळ वाॅकिंग करतात अंगात टि शर्ट सांगायचे तात्पर्य म्हणजे सर खेळाडूंच्या ड्रेसिंग मध्ये असलेले मला दिसले मला कुतुहल वाटले की,या मुंबई सारख्या मायानगरीत, धक्काधक्कीच्या जिवनात देखील सरांचे किती शिस्तबद्ध जिवन आहे.सरांची उत्तम अशी शरीरयष्टी, नवतरूणाला लाजवेल असे चेह-यावरील तेज,त्या तेजदार चेह-यावरून म्हात्रे सरांचा दृढ आत्मविश्वास एक क्षणातच मला सर्व काही सांगून गेला.खरंच हे माणसं एवढी मोठी कशी होतात त्यांच्या अंगी अथांग सागराएवढा मोठेपणा कसा आला असेल बरं,या विचाराने मी गढून गेलेला,लगेच सर म्हणाले अरविंदजी पहीले आपण काॅफी घेवूत मी म्हणालो सर ठिक आहे.फिरत फिरत आम्ही दोघे एका काॅफी सेटर वरती काॅफी पीत पीत माझ्या कुटुंबापासून ते सरांच्या कुटुंबीया पर्यंत इत्यंभूत माहीती सर्व सरांनी व मी एकमेकांना शेअर केली. नंतर शेती,राजकारण,समाजकारण,देश,विदेशातील घडामोडी,”आरोग्य हेच धन” या मुलमंत्राना प्राधान्य देणारे म्हात्रे सर मला एक अजबच रसायन वाटायला लागले,खरंच विधात्याने सरांना शरीरयष्टी, सौंदर्य, आत्मविश्वास,जिद्द, चिकाटी,अफाट ज्ञान,कोणताही विषय असो ,कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नाला हात घाला त्यांचे उत्तर सरांकडे तयारच असते.खरंच किती.. किती या महान व्यक्तीमत्वात
ईश्वराने एवढी अफाट विद्धवता भरली असेल या माणसाला जन्माला घालताना कोणत्याही गोष्टीची कसुर ईश्वराने ठेवलेली नाही असे एक ना अनेक विचार मनात प्रश्नाचे काहूर माजवित होते. हे व्यक्तीमत्व म्हणजेच पैसा,प्रतिष्ठा,शरिर, सौंदर्य,मंत्री,उद्योगपती, सुपर क्लासवन अधिकारी, ज्ञानाचे भांडार या सर्व काही बाबी स्वत:जवळ असूनही, सरांच्या अंगी ना अहंकार ,ना गर्व, मोठेपणाचा आव नाही, सदा हसतमुख प्रसन्न असा चेहरा एवढ्या मोठ्या उंचीवर असणा-या महान व्यक्तिमत्वाच्या सान्निध्यातील तिनचार तासाचा वेळ कसा भुर्रकन निघून गेला कळाले सुध्दा नाही…!

(दादर येथील तीन- चार तासांच्या महेश म्हात्रे सरांच्या सानिध्यातील घटना क्रम पुढील लेखात…)

लेख:- अरविंद देवराव जाधव पाटील
संपादक:-तेजपुंज न्यूज, तेज महाराष्ट्र
प्रदेश प्रभारी:- पत्रकार प्रेस परिषद महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष:- कै.देवराव प्रभुजी पाटील सेवाभावी संस्था वाटेगांव
अध्यक्ष:- शंभुराजे व्यायाम शाळा व क्रिडामंडळ वाटेगांव ता.हदगांव
जि.प्र. :- सुदर्शन टि.व्ही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे