0
4
8
3
0
1
अ आ आई
अ आ आई
दे ना ग लाडू
गाऊन अंगाई
झोपव मज लाडूलाडू ॥१॥
खाऊची वाटी
नी काजूची चिक्की
देऊ नको छोटी
कॅडबरी मात्र दे नक्की ॥२॥
स्वच्छ ठेवीन दात
ही माझी हमी
घेऊ नको मागे हात
पडणार नाही मी कमी ॥३॥
अ आ आई
किती तुझी माया
निजायला दुलई
नी डोईवर छाया ॥४॥
अ आ आई
जातो मी शाळेला
गिरवतो अक्षर नईनई
नंबर आणतो पहिला ॥५॥
बक्षीसी दे गोडगोड गोळी
आणि पुरणपोळी
जोडीला मोहनथाळी
नी,चवीला फणसपोळी ॥६॥
नीला पाटणकर,शिकागो
===========
0
4
8
3
0
1



