ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध
आम्ही पंख देतो तुला
कुसुम पाटील कसबा बावडा, कोल्हापूर

0
6
0
4
9
7
आम्ही पंख देतो तुला
आम्ही पंख देतो तुला
गवसणी घाल आकाशाला
घाबरू नको तू कशाला?
क्षितिजा पर जाण्याला
आत्मनिष्ठ हवी मनी
मिळेल मना संजीवनी
सुख येईल प्रांगणी
का गातेस उदास वाणी
श्वास निश्वास अंतर
हेच जीवनाचे सार
चांदणं शिल्प भुवर
तयात आनंद भर
क्षणभंगुर जीवन आपले
जाणे इथे कणकण
जग तू भरभरून
जीवनाचे क्षण क्षण
क्षितिजाची ओढ मनी
उदास सावलीच मनी
जागवी विश्वास हृदयी
घेशील झेप गगनी
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
0
6
0
4
9
7



