0
4
8
2
9
3
मुक्तिपथ
काय गुन्हा घडला
अब्रूचे लक्तर वेचत
हा देह परत उठला
काय गुन्हा घडला
जगण्याला नवा अर्थ देत
नशीबाशी झुंज देत
हा देह परत झिजला
काय गुन्हा घडला
वात्सल्य पदरी जपत
अस्मिता स्वतःची घडवत
हा देह स्वतःसाठी नटला
काय गुन्हा घडला
जगण्यास असंख्य प्रश्नावली
उत्तरे काळामागे दडली
हा देह एकटा पडला
काय गुन्हा घडला
विश्वासघात साहूनी
पाठीवरी वार झेलुनी
हा देह स्वतःच्या प्रेमात पडला
काय गुन्हा घडला
मुक्तीपथ स्वतः खेचला
स्वतःच्या हक्कासाठी परत लढला
हा देह निशब्द होऊन पेटला
काय गुन्हा घडला
सरोज फुलझेले
जि.नागपूर
=======
0
4
8
2
9
3



