
0
3
3
3
2
1
संवाद नात्यातला
घर झालं मूकं
शब्द,झाले अबोल,
आधुनिक या जगी
घरात वाढले जंगल.
संवाद नात्यातला
झाला आहे कमी,
तेवढ्यापुरते तेव्हढे
संबंध ठेवतो आम्ही.
हृदयात अढी रागलोभाची
मनात कायम दुरावा,
प्रेम उसनेतरी किती घेऊ?
चिटकेना नात्याला ओलावा.
थोडा,फुरसतीचा वेळ
राहिलाच नाही आता,
गप्पाटप्पा,झाल्या बंद
कोणा,सांगू दुःखाची व्यथा.
जो तो,धावतो स्पर्धेत
सिद्ध करतो, स्वतःला,
शानशौक,मौजमजाकरूनही
उरला फक्त घरात एकला.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत जि.परभणी
==========
0
3
3
3
2
1