Breaking
अलिबागई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

शब्दशस्र

पांडुरंग घोलप जुन्नर, जि पुणे

0 5 3 6 5 7

शब्दशस्र

शब्द हेच अस्र
शब्द हेच शस्त्र
तारणार मारणार
हेच ब्रम्हास्त्र..||१||

शब्द आपले आपण
हृदयातून निवडावे
शब्दांच्या स्पर्शानेही
मायेचे दार उघडावे..||२||

करावा विचार सारासार
शब्द शब्द वापरताना
भावनेचा ओलावा असावा
दुसर्‍यास सावरताना…||३||

परखड बोलताना नेहमी
शब्द असावे तोलूनमापून
इतरांच्या मतांचाही
आदर करावा जपून …||४|

शब्द धारदार हत्यार आहे
ज्याने मने दुरावतात
शब्द सात्विक भांडार आहे
ज्याने परके आपले होतात ..||५||

पांडुरंग घोलप
जुन्नर, जि पुणे
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 5 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे