0
4
8
2
9
0
रीते हे आभाळ
बरसल्या बरसल्या धारा
रीते रीते हे आभाळ
भरल्या भरल्या त्या ढगांचा
कुठे गेला हो काळ
तप्त तप्त त्या झळा
झुळूक झुळूक अंगभर
गार गार झोंबे गारवा
गर्मीचा पारा क्षणभर
अल्लड अवखळ धरा
हिरवा हिरवा श्रृंगार
जेष्ठ जेष्ठ तो मास
कसा झेलावा प्रहार
श्रावण श्रावण फुलला
मना मनात झुलला
येता माघ मागावर
बरसने हा विसरला
उब उब ती मायेची
थांबेना थांबेना काळ
भरभर वाढला देह
सोसवेना जीवनाचा भार
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि.बीड
============
0
4
8
2
9
0



