Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरगुन्हेगारीनागपूरविदर्भ

लाचखोर महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

उमरेड तालुक्यातील बेला येथील कारवाई

0 4 8 2 8 2

लाचखोर महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

उमरेड तालुक्यातील बेला येथील कारवाई

प्रतिनिधी, अखिल रोडे

नागपूर/बेला : (दि १४) सातबारावरील नावात दुरुस्ती करणे आणि आईचे नाव कमी करण्याच्या बदल्यात १ हजार रुपयांची उर्वरित लाच स्वीकारताना बेला (ता. उमरेड) येथील अपर तहसील कार्यालयातील महसूल सहायकाला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. विजय भगवानजी शडमाके असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

​नेमकी घटना काय?

​या प्रकरणातील तक्रारदाराला त्यांच्या नातेवाईकांच्या नावातील सातबारा दुरुस्ती आणि आईचे नाव कमी करायचे होते. यासाठी त्यांनी बेला येथील अपर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी महसूल सहाय्यक विजय शडमाके याने ४,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ३,००० रुपये देण्याचे ठरले, ज्यापैकी २,००० रुपये शडमाकेने आधीच घेतले होते.
​उर्वरित १,००० रुपये दिल्यावरच काम होईल, असे शडमाकेने निक्षून सांगितल्याने तक्रारदाराने नागपूर ‘एसीबी’कडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

​अशी झाली कारवाई:

​मिळालेल्या तक्रारीवरून ‘एसीबी’च्या पथकाने शुक्रवारी (दि. १३) सापळा रचला. तक्रारदाराकडून १,००० रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने शडमाकेला झडप घालून ताब्यात घेतले. याप्रकरणी बेला पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ​ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुयर चौरसिया व त्यांच्या पथकाने केली.

​नागरिकांना आवाहन: कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे संपर्क साधावा.

2.3/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे