
0
5
2
4
4
3
शांतता ठेवूया
मन असेल अशांत
मन ठेवू सुशांत
ध्यानस्थ बसून जाऊया
आपण शांतता ठेवूया
लगेच प्रत्युत्तर देवू नये
शब्दास शब्द वाढवू नये
मौनी आपण होऊन जावे
थोडं चिंतन करून घ्यावे
पुढचा बोलेल उलटून
आपण बोलावे तोलून
मार्मिक ते बोलावे
माणसास न्याहाळून घ्यावे
बागेतून याव फिरून
शांतता घ्यावी हेरून
फुलांचा घेऊ सुगंध
मनात अपुल्या फुलवू आनंद
शांततेने जीवनी हर्ष
मंद वार्याचा झाला स्पर्श
वादळ आता झाले शांत
आपण राहू सदा निवांत
पुरुषोत्तम ठोंबरे
झिंगाबाई टाकळी,नागपूर
0
5
2
4
4
3



