
0
5
7
9
0
0
उठ विद्यार्थी जागा हो.
उठ विद्यार्थी जागा हो
जगाला दाखव अस्तित्व
प्राप्त परिस्थितीत सामोर
उघडून टाक भ्रष्ट मूळत्व
स्पर्धात्मक युगातील तरूणा
अडचणी संकटाला मात कर
धैर्याण स्वाभिमानन सामोरजा
सत्याची कष्टाची कास धर
संघटित होऊन आवाज उठव
एकात्मिक ताकद यशाची
शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार
मुळापासून शिक्षण बदलाची
विश्वास घातक्यानी केला घात
तरूण स्वप्नानाचा झाला बेकार
ऊठ विद्यार्थी जागा हो आता
पेपर फुटीचा घृणास्पद बाजार
गरीबांचा शिक्षण हक्क हिरावला
एकजूटीन संघर्षाची घे मशाल
तुझे स्वप्न तुझ्याच हाती आहे
निद्रिस्त अवस्थेतेला जागवेल
आशयाचा सागरात जगायच
भाग्य विधाता तरूण या देशाचे
ज्ञानाचाच उपासक आहेस तू
घटनाकार जीवन मुक्तीचे
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
=======
0
5
7
9
0
0



