0
4
8
2
9
7
ठिणगी
ठिणगी उडता वणवा पेटतो
कुशीतीलच गारगोट्यांनी आवार जळतं ।।
सजीवसृष्टी घायाळ होते…..
होत्याच नव्हतं अन् नव्हत्याच होतं होते ।।
भावनांच्या आवारात
कडवाहटतेची लाकडें पेटत ठेवता ……
ठिणगी उडणे सहज असते
वनव्याची आग जाईल कुठवरी….
याचेही भान नसते ।।
तेव्हा सांभाळावे शब्दांना….
शब्दांआधी …विचारांना….
शब्द घायाळ करतात…
पण त्याला विचारचं कारणीभूत ठरतात ….।।
कंचना मंडपे
ता. जि.नागपूर
========
0
4
8
2
9
7



