कवितेवर बोलू काही”; डॉ संजय पाचभाई
'मले का करा लागते' भाग 3
“कवितेवर बोलू काही”; डॉ संजय पाचभाई
‘मले का करा लागते’ भाग 3
काळ हेच दवाई मणते पण काळ माही इम्तेहानच घेतानी दिसते मूण ते नंदा भावजी चं पूराण मांगच्या भागात सांगलो असो..!! आतावरी दोन ताईले इचारपूस करून झाली पण नानाचाच घंटा वाजला मंग महा ट्युब लाईट लागला पून्ना समूहातल्या सूचना वाचल्यावर माह्या लक्षात आलं नागपूरच्या कवि साठी आहे मंग त्या काऊण मणूण येतीन? अर्ध्या हरकूंडात पिवरा कायले मणते ते मले आत्ता समजलं वाचण कमी आणं येलपाडणं च जास्त. यात माह्या ताईंचा कायीबी दोस नायी..!
मंग मिणं आपला मोर्चा हरूचस्यानी माह्या नागपूरच्या दोस्ताकड वरवला, त्यानच मले वनाडत या समूहात आणला. तो पक्का हुशार जी,ललित लेख, परवास वर्णन, खेलातल्या गंमतीजमती अस्सा कायी लिवतो का मले हेवाच वाटते त्याचा. तोबी डॉ. मीबी डॉ. पण त्याची नाडी वरखण्याची कला आणं माही कला जसे नदीचे काठ .तो एका याच्यात रोग वरखतो, मले शंबर तपासण्या कराले लावा लागते मूणच मी चार रचना लिवतो तवा कोटी एकांदी सर्वोत्कृष्ट येते. कवाकवा तं येत बी नायी.
येते कागा इतवारी कविसम्मेलनाले तं तोबी बयाड मणते माहा कोणतं काम मंग त्याले बी समजावून सांगलो अबे लेका तूणं दोन पूस्तकं लिवलीस ना तं आता पेलणं आमाले ग्याण. कायचं बे ते लिवून जमाना झाला का लिवलं ते मलेच आठवत नायी मंग त्याले हरूसकन्या सांगलो अबे आपले राहुल गुरुजी हाहे ना तेच निस्तारतीण सप्पा, आपण जे येते ते बोलून मोकरे. तवा कोटी त्याले धिर आला आणं त्याचं पाऊण मले बी…!!
✍️मृद्गंध✍️
डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह



