ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र दर्शन सहल
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि १६) ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर व अमरनगर जेष्ठ नागरिक मंडळ नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने 11 फेब्रुवारीला तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर (जिल्हा अमरावती) येथे ज्येष्ठ नागरिकांची सहल आयोजित करण्यात आली होती.
कौंडण्यपुर हे वर्धा नदीच्या काठावरती वसलेले प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र रुक्मिणीचे माहेर व भगवान श्रीकृष्णाचे सासर मानले जाते. याला विदर्भाचे पंढरी मानले जाते. येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, अंबिका माता मंदिर व ऐतिहासिक ताम्रपाषाण युगातील अवशेष पाहायला मिळतात.
ही सहल प्रतिष्ठानचे सचिव राजूजी मिश्रा यांचे मार्गदर्शनाखाली व मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर यांचे प्रयत्नाने सहल आयोजित करण्यात आली होती. सहलीमध्ये 35 जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. सहल यशस्वी करण्याकरिता मंडळाचे उपाध्यक्ष गणपतराव निंबाळकर, अशोक सांभारे, रमेश जिल्हारे , रामदास माहुरे, डॉ. राजेश कुऱ्हाडे, राजेश्वर डगरवार, गणपतराव निंबाळकर, रमेश जिल्हारे, विलास वाकडे, सौ. शोभा आगरकर, भोयर, एड. अरमरकर, सौ. गौरखेडे, सौ. रासेकर, सौ.भोयर, सौ. ज्योती निंबाळकर यांनी सहल यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले.



