0
4
8
2
9
0
मन वेडे झाले झुरून
मिळविले काय मला , दूर तू करून
तुझासाठी वेड मन, झालं गं झुरून… धृ
अस कसं माझ्यातून, भरलं गं मन
काय तुला भेटले गं, मन दुखाऊन
शेवटली आस होती, गेली गं सरून
तुझ्यासाठी वेड मन, झालं गं झुरून… १
आजवरी सांग तुला, काय कमी केले
लावला मी जीव तुला, व्यर्थ सारे गेले
वाटते मी आज इथे, जावे गं मरून
तुझ्यासाठी वेड मन, झालं गं झुरून… २
वैय्रावाणी करू नको, माझा राग राग
आतातरी प्रेमातल्या, वचनाला जाग
मनात हा राग किती, ठेवशील धरून
तुझ्यासाठी वेड मन, झाल गं झुरून… ३
तुझ्यासाठी जीव माझा जळतो गं फार
तरी का तू वार केले, काळजाच्या पार
आसवांनी डोळे माझे, आले ग भरून
तुझ्यासाठी वेड मन, झालं गं झुरून….४
सुभाष मानवटकर (निळं पाखरु)
हिंगणा नागपूर
========
0
4
8
2
9
0



