
0
6
3
0
9
4
माकडाचे दुकान
माकडदादा, माकडदादा,
कशाचे तुम्ही दुकान लावले
केळी, पेरू,आंबे, फणस
सगळी फळे पिशवीत भरले
ताज्या फळांचा बोर्ड लावले
खाऊन बघा तुम्ही म्हणाले
ससा आला, अस्वल आले
पोपट, हत्ती सगळे आले
माकड म्हणाले पैसे नकोत
सगळी फळे देईन तुम्हाला
तुम्ही सारे नाचून दाखवा
कला तुमची बघू द्या मला
गोड गोड फळे खाण्यासाठी
सगळे उत्साहाने नाचू लागले
माकडाचे दुकान फळांनी भरले
ताजी ताजी फळे खाऊ लागले
हत्तीला फळे काही खाता येईना
हत्तीदादा मग उपाशीच राहिले
प्राण्यांनी सगळी फळे फस्त केले
माकडाचे हसून हसून पोट दुखले
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
0
6
3
0
9
4



